शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (08:18 IST)

२० कोटींच्या खंडणी; साताऱ्यामध्ये गजा मारणे टोळीतील दोघांवर मोक्का

jail
पुणे : शेअर दलालाचे २० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात कोथरुडमधील गुंड गजानन उर्फ गजा मारणे याच्यासह १४ जणांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाईचे आदेश मंगळवारी दिले.
 
या प्रकरणी गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), हेमंत उर्फ अण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली, ता. पलूस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६), फिरोज महमंद शेख (वय ५०, दोघे रा. कोडोली, जि. सातारा), रुपेश कृष्णराव मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दापोडी), अजय गोळे (रा. नऱ्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, पद्मावती), नवघणे यांच्यासह साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
 
शेअर दलालाचे अपहरण केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात चौघांना अटक करण्यात आली आहे. गज्या मारणे आणि साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. खंडणी विराेधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी मारणेसह साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्त गुप्ता यांनी मंजुरी देऊन मारणे टोळीच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor