शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (14:50 IST)

सेक्सटॉर्शनमुळे तरुणाची आत्महत्या

suicide
सोशल नेटवर्कींग साईटवर तरूणीशी झालेल्या ओळखीतून तरुणाने दिलेले न्यूड व्हिडीओ व्हिडीओ, मेसेजस व्हायरल करण्याच्या धमकीला घाबरून तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 
अमोल (वय 22 धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी एका तरुणीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अमोलची काही महिन्यांपूर्वी सोशल नेटवर्कींग साईटवर एका अनोळखी तरूणीशी ओळख झाली होती. दोघांमधील संवाद वाढला. त्यानंतर तरुणीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास समाजमाध्यमावर ध्वनीचित्रफित प्रसारित करण्याची धमकी तिने अमोलला दिली. त्यानंतर अमोलने तिला ऑनलाइन पद्धतीने साडेचार हजार रुपये पाठविले. त्यानंतरही तरुणी त्याला धमकावत होती.
 
अमोलने तिला ‘मैं सुसाईड करा रहा हू’,असा संदेश तिला पाठविला होता. त्या वेळी ‘करो सुसाईड, मैं सोशल मिडियापर व्हीडीओ व्हायरल कर रही हू, अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली. तरुणीच्या धमक्यांमुळे अमोलने 30 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली,

Edited by : Ratnadeep Ranshoor