शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (17:28 IST)

पुण्यात प्रेमभंगामुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुण्यात सकाळी रेल्वेच्या स्थानकात एका तरुणाने प्रेमभंगातून टोकाचं पाऊल उचलत स्वतःच्या जीव देण्यासाठी रेल्वेच्या वर उभे राहून हाय वोल्टेज तारला धरून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गोवर्धन मल्ला(28) असे या तरुणाचं नाव असून तो खेड तालुक्यातील खळ उंबरे या गावात एका कंपनीत काम करतो.  
 
मिळलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर पुणे गौरखपूर एक्स्प्रेस उभी होती.त्याच रेल्वेत गोवर्धन बसला होता.त्याने दोन वेळा डब्यातून रेल्वेच्या डब्याच्या छत वर जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला रेल्वे कर्मचाऱ्यांनी अडवल्यामुळे यशस्वी होऊ शकला नाही. मात्र तिसऱ्यांदा तो रेल्वे कर्मचाऱ्यांची नजर चुकवून चढला आणि त्याने रेल्वेच्या वरून जाणाऱ्या हायव्होल्टेजच्या तारला धरलं त्याला जबरदस्त शॉक लागला आणि तो डब्यावरच कोसळला. ही संपूर्ण घटना मोबाइलला मध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 
व्हिडीओ मध्ये हा तरुण लपून छपून जाताना दिसत आहे, त्याने हाय वोल्टेजच्या तारला हात लावला आणि त्याच्या शरीरावर आगीच्या लाटा दिसत असून तो खाली कोसळताना दिसत आहे. 
 
गोवर्धन 80 टक्के भाजला असून त्याला ससून रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्याने असं प्रेमभंगातून केलं असल्याचे समजले आहे. 

Edited By- Priya Dixit