सोमवार, 14 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (09:06 IST)

पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली

suicide
पुण्याच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत MPSC ची तयारी करणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्रिगुण काळे असे या मयत तरुणाचे नाव आहे. त्रिगुण जालन्याचा रहिवासी असून जानेवारी 2021 पासून MPSC  स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मयत त्रिगुण ने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे त्याच्याजवळ सापडलेल्या सोसाइड नोट वरून समजले. मंगळवारी दुपारी त्याने गांजवे चौक परिसरात राहत्या भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाजवळ एक सोसाइड नोट सापडली असून त्यात मी नैराश्यामुळे आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटले आहे.  या वर्षी त्याने MPSC स्पर्धा परीक्षा दिली होती. त्याच्या आत्महत्याने खळबळ उडाली आहे