गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (08:18 IST)

मुख्यमंत्री यांच्यासारखा दिसत असल्याने तरुणावर पुणेपोलिसांनी कारवाईचा बडगा

shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसत असल्याने पुण्यात हवा करत असलेल्या तरुणावर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विजय नंदकुमार माने याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
माने याने चेहऱ्यावर वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा आणि परिधान केलेलं व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट यामुळे ते शिंदे यांच्यासारखेच दिसत आहेत. त्याचे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होते. आताही त्याने शिंदेंसारखाच पोशाख परिधान करून सऱ्हाईत गुन्हेगार शरद मोहोळ सोबत फोटो सेशन केले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
 
व्हॉटसॲप व फेसबुक या सोशल मीडियावर अधिक माहिती घेतल्यावर पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो पाहिल्यावर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसला असल्याचे दिसत आहे. फोटो नीट पाहिल्यावर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नसून तो विजय माने याचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक माेहन जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.