मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (22:47 IST)

पुण्यात डिलिव्हरी बॉय कडून तरुणीचा विनय भंग,डिलिव्हरी बॉयला अटक

rape
पुण्यातील येवलेवाडी येथे एका सोसायटीत शनिवारी फूड डिलिव्हरीबॉय ने एका 19 वर्षीय तरुणीचा चुंबनघेत तिचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. रईस शेख असे या आरोपीचे नाव आहे. हा डिलिव्हरी बॉय झोमॅटो कंपनीत काम करतो तर पीडित  

तरुणी ही एका नामांकित कंपनीत काम करते. पीडित तरुणीने शनिवारी रात्री ऑनलाईन फूड ऑर्डर केले. पार्सलची डिलिव्हरी घेऊन सदर आरोपी रात्री 9:30 च्या सुमारास सोसायटीत दाखल झाला. नंतर आरोपीने तरुणीला पार्सल देऊन पाणी पिण्यासाठी मागितले आणि नंतर तिला थँक्यू म्हणत तिचा हात धरून जवळ ओढले आणि गालावर चुंबन घेतले. घडलेल्या प्रकारामुळे ती घाबरली आणि तिने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीच्या विरोधात तक्रार केली. नंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली.