शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (21:59 IST)

पुणे सातारा महामार्गावर दोन ट्रकची धडक होऊन अपघात

accident
पुणे सातारा महामार्गावर हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दुसरा ट्रक धडकल्याने हायड्रोजन पेरॉक्साइड गॅस गळती होऊन वाहतूक कोंडी झाली. हा अपघात वेळू गावाजवळ कुदळे पेट्रोल पंपा समोर झाला. 
सकाळी दोन ट्र्क साताऱ्याच्या दिशेने पुणे -साताऱ्या मार्गावरून जात असताना हायड्रोजन पेरॉक्साईडचे 400 कॅन घेऊन कल्याणहून तमिळनाडूला जाणाऱ्या ट्रक ने मागून धडक दिली. या धडकेमुळे ट्रक मधील हायड्रोजन पेरॉक्साईडची गळती झाली आणि गॅस लीक झाला ट्रक यामधील ट्रक चालक  इम्रान सहिद अलीआणि वाहक बाबुल मकबूल अहमद सिद्दिकी हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.