1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (12:34 IST)

मैत्रिणीला मृत पाहून दुसरीनं मारली 5 व्या मजल्यावरून उडी

Suicide of two best friends
पुणे- हडपसर येथील शेवाळवाडी मध्ये दोन जिवलग मैत्रिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सानिका हरिश्चंद्र भागवत (वय- 19 ) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय- 19) अशी आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावं आहे.
 
यात एकीने गळफास घेतला आणि दुसरीनं तिला रुग्णालयामधून घेऊन जातानाच इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली.
 
आकांक्षा व सानिका या दोघीही मैत्रिणी होत्या. सात वाजण्याच्या सुमारास सारिकाने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सानिकाने गळफास घेतल्याचे कळताच कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना कळवले तेव्हा पोलिसांनी दार तोडून सारिकाचा मृतदेह खाली उतरवला. तिचा मृतदेह पोलीस रूग्णवाहिकेमध्ये घेऊन जात असतानाच तिची मैत्रीण आकांक्षाने त्याच इमारतीचा पाचव्या मजल्यावरुन उडी घेतली. तिने मैत्रीणिला घेऊन जाताना पाहिले आणि तिला जबर धक्का बसला.
 
पाचव्या मजल्यावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याने आकांक्षाचाही मृत्यू झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.