चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचा प्रारूप आराखडा
पुणे चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचा प्रारूप आराखडा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) तयार केला आहे. त्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांचा अभिप्राय मागविण्यात आला असून त्यांतर हा आराखडा अंतिम केला जाणार आहे. एनएचएआयने तयार केलेल्या प्रारूप आराखड्यानुसार नवीन उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये मुळशीकडून येऊन बावधन, कोथरूड, वारजेकडे जाणे आणि हिंजवडी, मुंबईच्या दिशेला जाणे शक्य होणार आहे.
महामार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौक येथील उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांची कामे केली जात आहेत. प्राधिकरणाच्या दाव्यानुसार येथील जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के काम जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.