रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (15:35 IST)

सिलिंडर स्फोटचा थरार; संपूर्ण घर उध्वस्त: घटना CCTV मध्ये कैद

मेरी-रासबिहारी लिंकरोड भागातील माने नगरात घरगुती गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटाचा थरार स्थानिक नागरिकांनी अनुभवला.
सुदैवाने या घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र, संपूर्ण घर जळून खाक झालं.विठ्ठल बोरकर यांच्या घरात झालेल्या या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की,
या स्फोटामुळे शेजारील घराचंही मोठं नुकसान झालं. पत्र्याच्या शेडच्या घरात ही गॅस गळती होऊन आग लागली. त्यात घरातील सर्व संसाराचा अक्षरशः कोळसा झाला. बोरकर यांचा टेलरिंगचा व्यवसाय असून, ते या घरात सहकुटुंब राहत होते. सुदैवाने ते बाहेर असल्याने या अपघातातून ते थोडक्यात बचावले.