बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (09:10 IST)

भाजपच्या प्रयत्नांमुळेच बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू - देवेंद्र फडणवीस

सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाचे आभार मानले आहेत.
तसंच भाजपच्याच प्रयत्नांमुळे बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू झाली आहे, असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.
यासंदर्भात ट्वीट करताना ते म्हणाले, "आमचा पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीवरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने मागे घेतली. याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो.
2014 साली न्यायालयाने ही बंदी घातली होती. आमचं सरकार राज्यात आल्यानंतर मी स्वतः यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.