मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (09:04 IST)

अन्यथा किरीट सोमय्या यांनी मला 100 कोटी द्यावे लागतील - अनिल परब

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी आणि माझी बदनामी करणं हाच किरीट सोमय्या यांचा धंदा आहे. याप्रकरणी मी अब्रूनुकसानीचा दावा हायकोर्टात दाखल केला असून डिसेंबरमध्ये याची सुनावणी होईल. त्यामध्ये किरीट सोमय्या यांना माफी मागावी लागेल किंवा 100 कोटी रुपये द्यावे लावतील," असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
अनिल परब यांनी लॉकडाउन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना ते रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
"किरीट सोमय्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण मी त्यांना बांधील नाही. ते मला प्रश्न विचारू शकत नाहीत," असं परब यावेळी म्हणाले.
या प्रकरणात मला ज्या अधिकृत संस्थांनी- यंत्रणांनी मला प्रश्न विचारले, त्यांना मी उत्तरे दिली. रिसॉर्टशी माझा संबंध नाही हे मी वारंवार सांगत आहे. पण बदनामी करण्यासाठी जाणूनबुजून माझा संबंध जोडला जात आहे. शासकीय यंत्रणा याबाबत योग्य ती कारवाई करतील," असंही अनिल परब यांनी म्हटलं.