मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (12:48 IST)

आठ महिन्यांची गर्भवती महिलेचा मृतदेह बिछान्यावर, शेजरी पतीचा गळफास

बीड- बीड येथे एका धक्कादायक प्रकारात एका बंद खोलीत पती आणि पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे. येथील वैतागवाडी येथे ही घटना घडली असून गर्भवती पत्नीसह पतीनं आत्महत्या केल्याचा अंदाज बांधला जात आहे. या दोघांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय. पोलिस पुढील तपास करत आहे. 
 
या दाम्पत्याचं लग्न 11 महिन्यापूर्वी झालं होतं. मृतक महिला आठ महिन्यांची गर्भवती होती आणि महिला बिछान्यावर मृतावस्थेत आढळून आली तर तिचा पती शेजारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दाम्पत्यानं आत्महत्या केल्यानं संपूर्ण परिसरात शोककळा पसरलीय.
 
मृतक व्यक्तीचं नाव राजेश भालचंद्र जगदाळे  (वय 27) तर पत्नीचं नाव दीपाली राजेश जगदाळे (वय 24) आहे. 16 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास नेकनूर पोलीस स्टेशनला ही घटना घडल्याचं फोन आल्यावर पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली.
 
या दाम्पत्याचा संसार सुखाचा सुरू होता मात्र, अचानक दोघांचे घरात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे दाम्पत्य शेतकरी कुटुंबातील आहे. राजेश व दिपाली दोघांचे आई वडील शेतात तुर काढण्यासाठी गेले होते. ते घरी परतले असताना घराचे दार आतून बंद होते आणि आवाज दिल्यावरही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं नातेवाईकांनी दार तोडून आत प्रवेश केला असता हा प्रकार समोर आला. या घटनेमुळं अनेक प्रश्न निर्माण झाले असून दोघांची हत्या आहे की, आत्महत्या याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे.