मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (09:13 IST)

आम्ही आहोत म्हणूनच राज्यात सत्ता - अशोक चव्हाण

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा असून हे सरकार मजबूत राहिले पाहिजे अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे. राज्यात आम्ही आहोत म्हणूनच सत्ता आहे, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
जालना जिल्ह्यातील मंठा नगरपंचायतीच्या प्रचारादरम्यान अशोक चव्हाण बोलत होते.
ते पुढे म्हणाले, "राज्याचा विकासाचा गाडा हा पुढे चालत राहिला पाहिजे, यासाठी महाविकास आघाडीचे सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे.
"स्थानिक पातळीवर जरी आम्ही वेगवेगळे निर्णय घेतले तरी हरकत नाही. मात्र, राज्य व्यवस्थित चालले पाहिजे, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सध्या महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे," असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.