सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (20:57 IST)

रिसॉर्ट पाडण्यासाठी लवकरच टेंडर निघणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली

Kirit Somaiya
रत्नागिरी दापोलीतील त्यांचा रिसॉर्ट दिवाळीपर्यंत पाडण्यात येणार असल्याचा दावा सोमय्यांनी केलाय. याबाबत किरीट सोमय्या रोज अपडेट्स देत आहेत. आज पुन्हा एक व्हिडीओ जारी करत त्यांनी महाविकास आघाडीलावर टीकास्त्र सोडलं. तसंच, लवकरच महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक असलेले रत्नागिरी दापोलीतील ट्वीन रिसॉर्ट दिवाळीपर्यंत पाडणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.
 
रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत दापोलीतील ट्वीन रिसॉर्ट पाडण्याचा आराखडा तयार झाल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. तसंच, हे रिसॉर्ट पाडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला सोमय्यांनी दिला होता. त्यानुसार, कोणतं तत्रज्ञान वापरायचं आणि रिसॉर्ट पाडण्यासाठी लवकरच टेंडर निघणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.