सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 31 जुलै 2022 (09:43 IST)

कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी संजय राऊतांवर गुन्हा दाखल

sanjay raut
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी मुंबईथील वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय कलम 507 अंतर्गत राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 
या कथित ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती महिलेला शिवीगाळ करत असल्याचे ऐकू येते. ही व्यक्ती संजय राऊत असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलाय.
 
वाकोला पोलीस ठाण्यात ज्या महिलेनं राऊतांविरोधात तक्रार दिली, त्या महिलेनं कथित ऑडिओ क्लिपही पोलिसांकडे सुपूर्द केलीय.
 
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संजय राऊतांवर कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केलीय.