मंगळवार, 21 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (10:08 IST)

bus accident : कंटेनर आणि शिवशाही बसचा सासवडजवळ भीषण अपघात

accident
पुण्यातील सासवड येथे रविवारी मध्यरात्री शिवशाही बस आणि कंटेनरच्या भीषण अपघात झाला. या मध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर सहा जखमी झाले आहे. रविवारी मध्यरात्री 12:29 वाजेच्या सुमारास सासवड मार्गावर उरुळी देवाच्या हद्दीत हॉटेल सोनाई जवळ कंटेनर आणि शिवशाही बस यांच्यात हा भीषण अपघात झाला असून त्यात एक प्रवाशी जागीच ठार झाला तर सहा प्रवाशी जखमी झाले आहे. 

अपघात होऊन बस मध्येच प्रवाशी गाडीत अडकले होते. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.  शिवशाही बसमधे ड्रायव्हर सीटमागे एक जखमी व्यक्ती अडकला होता. तात्काळ अग्निशमन उपकरण फायर एक्स वापरत पाचच मिनिटात सीटवर अडकलेल्या व्यक्तीची सुटका करून त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविले. दोन्ही वाहने सोडविण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.