मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (15:29 IST)

शिवशाही बस आणि कंटेरचा भीषण अपघात

accident
पुणे : येथे एसटी महामंडळाच्या शिवशाही बस आणि कंटेरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर चालक, वाहक आणि सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. संजय एकनाथ भायदे (रा.मुरुड, वय ५२ वर्षे) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. हा अपघात एवढा भीषण होता की धडकेत कंटेनर आणि शिवशाही बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शिवशाही बस पंढरपूरहून प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेने जात होती. ही बस पुणे-सासवड रस्त्यावर आली असताना उरळी देवाची फाट्याजवळ असलेल्या गोदामातून निघालेला कंटेनर शिवशाही बसच्या समोर आला आणि जोरदार धडक झाली. रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघातात बस आणि कंटेनरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ज्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर चालक, वाहत आणि प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.