1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (14:49 IST)

पुण्यात रहिवाशांमध्ये तुफान हाणामारी

Clashes between residents in Pune
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण झाली. या हाणामारीत महिलाही जखमी झाल्या आहेत. 
 
पार्किंगमध्ये ड्रेनेजचं पाणी सोडण्याच्या तसेच रस्त्यावरुन ये-जा करण्याच्या वादातून हल्ला झाल्याचे समोर येत आहे. दोन्ही बाजूंकडून हवेली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. 
 
मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यात दिसून येत आहे की दोन्ही इमारतींमधील सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर वातावरण भयंकर हाणामारीत बदलतं.