गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 जानेवारी 2022 (12:29 IST)

एकाच दिवशी 5 जणांची आत्महत्या

साताऱ्या जिल्ह्यातील विविध भागात पाच जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गणपत कणसे(35 रा. विहे पाटण ), सुमित गायकवाड(28 रा.हवेली कराड), अमोल पाटील(37 रा. सुपने कराड),अक्षय इंगवले(27 किडगाव, सातारा), आणि पोपट ढेडे(40 रा. वाई भुईंज ),अशी आत्महत्या केलेल्या पाच जणांची नावे आहेत.

आत्महत्या चे कारण कौटुंबिक वाद आणि आजारपण असल्याचे सांगितले जात आहे. या कारणामुळे त्यांनी गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले आहे. 
 
एकाच दिवशी पाच जणांनी आत्महत्या केल्याने जिल्हा हादरले आहे. या पैकी तीन जण कराड चे आहेत. हे सर्व जण 40 वर्षाच्या आतील असल्याने तरुणाची आत्महत्या हा चिंतेचा विषय बनत आहे. या तरुणांनी आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.