मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 एप्रिल 2021 (09:13 IST)

तळेगावात ‘जनसेवा थाळी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

गरीब व गरजू रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौकात 5 रुपयात जनसेवा थाळीचा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला 200 गरीब व गरजू लाभार्थी या जनसेवा थाळीचा लाभ घेत आहेत. या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती या उपक्रमाला मदतीचा हात देत आहेत.
 
जनसेवा थाळी केवळ 5 रुपयात उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनाही मोफत जेवण दिले जात आहे. दुपारी 12.30 ते 2.30 वा. या कालावधीत ही थाळी मिळते. परिसरातील गरीब व गरजू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून ही थाळी घेण्यासाठी रांगा लावतात.