पुण्यात गरजुंसाठी फक्त 10 रुपयात भोजन थाळी, जाणून घ्या कुठं
पुण्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहे. या स्थितीत पुण्याची अवस्था खूप बिकट झाली आहे. तर पुण्यात हातावरचे पोट असणाऱ्या गरिबांना, कष्टकरी वर्गाना ओसवाल बंधू समाज संस्थेनी फक्त १० रुपयांमध्ये भोजन थाळीची योजना प्रारंभ केली आहे. मार्केट यार्डातील दि पूना मर्चंट्स चेंबरने या योजनेस सहकार्य केले आहे.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सवांद साधताना कडक निर्बंधांमध्ये गरजू व्यक्तीसाठी मोफत शिवभोजन थाळी सुरु केलीय. यालाच प्रतिसाद म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ओसवाल बंधू समाज संस्थेनी भोजन थाळीला प्रारंभ केला आहे. या १० रुपये थाळीमध्ये मसाले भात, पुरी, भाजी, मिष्टान्नाचा समावेश आहे. ओसवाल बंधू समाजाचे उपाध्यक्ष प्रकाश पारख, सचिव जवाहरलाल बोथरा, दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा आदींनी या उपक्रमाला प्रारंभ केलीय.