रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 जून 2017 (10:49 IST)

एसटीच्या ' त्या' ड्रायव्हर,कंडक्टरवर राजद्रोहाचा गुन्हा

‘जय महाराष्ट्र’ लिहिलेली पहिली बस बेळगावात आल्यावर ‘जय महाराष्ट्र’ म्हणून घोषणा दिल्याप्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह एसटीचे ड्रायव्हर,कंडक्टर यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.मदन बामणे, अमर यळ्ळूरकर, गणेश दड्डीकर, सुरज कणबरकर यांच्यासह अन्य बारा जणांवर राजद्रोहाचा गुन्हा मार्केट पोलिसांनी दाखल केला आहे. 143, 147 आणि 153 अ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘जय महाराष्ट्र’ लिहिलेली महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली एसटी बेळगावात दाखल झाली. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बसचं जंगी स्वागत केलं. तसंच बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पुष्पगुच्छ आणि भगवा फेटा घालून स्वागत केलं.