शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2023 (21:24 IST)

एसटीने दोघांना चिरडले, आठ महिन्यांच्या चिमुरडीसह आई वडिलांचा मृत्यू

वणी – सापुतारा महामार्गावर खोरी फाट्यानजीक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील पती, पत्नी व त्यांच्या 4 महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास  घडली. 
 
या घटनेत विशाल नंदू शेवरे (२४), सायली विशाल शेवरे (२०) व अमृता विशाल शेवरे (4 महिने) अशी मृतांची नावे आहेत. सुरगाण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या बस (क्रमांक एमएच ७ सी ९३४६) चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरात धडकली. त्यामुळे दुचाकी उडून रस्त्यालगतच्या कांद्याच्या शेतात पडली, तर बस झाडावर जाऊन आदळली. त्यामुळे बसमधील पाच प्रवासी जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.  

Edited by : Ratnadeep Ranshoor