नदी चक्क उलट्या दिशेने वाहू लागली
साधारण पणे नदीचा प्रवाह एकाच दिशेने असतो. पण जर नदी सरळ प्रवाहाने न वाहता एकाएकी उलट्या दिशेने वाहू लागली तर आश्चर्याचा धक्काच बसेल. असेच काहीसे घडले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हिरण्यकेशी ही प्रसिद्ध नदी शनिवारी सायंकाळी चक्क उलट्या दिशेने वाहू लागली. हिरण्यकेशी नदीवर गोटूर बंधारा जवळ ही आश्चर्यकारक घटना घडली आहे. हा चमत्कार कर्नाटकात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर घडल्याचे बोलले जात आहे.
झाले असे की कर्नाटकात ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून कर्नाटकातील निडसोशी, कमतनूर, गोटूर व पंचक्रोशीत भागातील 'कापूर' नावाच्या ओढ्याचे पाणी दुथडी वाहत हिरण्यकेशी नदीत आले आणि पाण्याचा हा प्रवाह कर्नाटकात पूर्वीचे दिशेने न वाहता पश्चिमी दिशेकडे वाहू लागला. त्यामुळे हिरण्यकेशी नदीपात्रातील पाणी उलट्या दिशेने वाहू लागले.