गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2023 (16:46 IST)

देशातील रंगपंचमी वेगळी ओळख जपणारी नाशिक रहाड संस्कृती आणि रंगोत्सव..

महाराष्ट्रात सर्वत्र होळीच्या दुसर्‍या दिवशी धुळवडला रंग खेळळा जातो. मात्र, नाशिकमध्ये पंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे. इतर ठिकाणांपेक्षा नाशिकला रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने खेळली जाते. होळीच्या पाचव्या दिवशी शहरात रंगपंचमी खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे. मंगळवारी (दि.६) होणाºया रंगोत्सवासाठी या इतिहासकालीन रहाडी खुल्या करण्यात आल्या असून, नाशिक-करांना त्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. पेशवेकाळापासून रंग खेळण्यासाठी जुने नाशिक व पंचवटीच्या विविध भागांत रहाडींची निर्मिती करण्यात आली होती. ४दर वर्षी होळीच्या दुसºया दिवसापासून रहाडीचे खोदकाम काम सुरू होते. रंगपंचमीच्या आदल्या दिवसांपर्यंत स्वच्छता करून त्यात स्वच्छ पाणी भरून ठेवले जाते. ४रंगपंचमीच्या दिवशी त्यात रंग तयार करून टाकले जातात. त्यानंतर पुन्हा रहाडीची पूजा करून नागरिकांना रंग खेळण्यासाठी मोकळी करून दिली जाते.  या पेशवेकालीन रहाडीत पाणी आणि रंग मिसळून जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा होते. या रहाड संस्कृतीला खूप मोठा इतिहास असून ती वर्षानुवर्षे तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे.
 
 
रहाड म्हणजे काय तर –
पूर्वी गल्लीतील तालमीच्या पेहलवान मंडळींच्या गटा तटाची शक्ती प्रदर्शनची जागा म्हणजे रहाड मानाली जायची. येथे कधी काळी कुस्तीचे सामने सुद्धा आयोजन केले जायचे.कुस्तीच्या ह्या आयोजन मुले येथे हाणामाऱ्या होत असे त्यामुळे राहाडा हा शद्बप्रयोग प्रचलित झाला असावा आणि त्याच्या वरून रहाड हा शब्द नाशिक लोकांच्या मनावर कोरला गेला आहे.नाशिक मधील लोकांची राहाड वर धप्पा मारल्या शिवाय रंगपंचमी पूर्ण होत नाही.
 
भारतात फक्त नाशिक मध्ये शिल्लक राहिलेल्या रहाड संस्कृतीविषयी त्यातच शनी चौक , दिल्ली दरवाजा,तांबट लेन व तिवंधा येथील रहाडींविषयी आज आपल्याशी विस्तृत अशी माहिती जाऊन घेऊ या ...
 
नाशिकची रहाड संस्कृती...
भारतात फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात धुलिवंदनाला रंगांचा उत्सव साजरा करतात तसेच काही ठिकाणी तो फाल्गुन कृष्णपंचमीला अर्थात रंगपंचमीलाच साजरा करतात पण नाशिक मध्ये हा रंगांचा उत्सव फक्त रंगपंचमीलाच साजरा केला जातो.
 
भारतातील सर्व प्रदेशात हा रंगांचा उत्सव आपल्या वैविधपूर्ण पद्धतीने खेळला जातो त्यातलं नाशिकचा वैशिष्ट्य म्हणजे रहाडीत खेळण्यात येणारी रंगपंचमी. रहाडीची उत्पत्ती मुळात आपल्याला पेशवेकाळात घेऊन जाते.
 
पेशवे हे खरे रहाडींचे जनक पेशव्यांनीच २५० ते ३०० वर्षांपूर्वी दगड आणि चुन्यात या रहाडींचं बांधकाम केलं. राहाडींची जर आपण वास्तुरचना पाहिली तर आपल्याला एक चौरसाकार हौद दिसून येतो बऱ्याच रहाडींची लांबी व रुंदी आपणास सारखीच आढळून येते. नाशिकमध्ये आधी एकूण १८ रहाडी अस्तित्वात होत्या पण आता फक्त ४ पहावयास मिळतात
 
१) काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाज्याला असणाऱ्या शनी चौकातील
२) गाडगेमहाराज पुलाजवळील दिल्ली दरवाज्याची,
३) तिवंद्यातील बुधा हलवाई जवळची
४) जुन्या तांबट लेन मधली
५) तांबट आळी मधली रहाड
६) मधली होळी मधली रहाड
 
पेशवेकाळात या रहाडी पेशव्यांच्या सरदारांच्या अखत्यारीत होत्या त्या नंतर विविध तालमींच्या अखत्यारीत येऊन आता स्थानिक मंडळांजवळ सामावल्या आहेत.
 
शनी चौकातील रहाड :- पेशवेकाळापासून असणाऱ्या या राहाडीची हि परंपरा आज शनी चौकातील शनी चौक मित्रमंडळ आणि सरदार रास्ते आखाडा अतिशय परंपरेने जपत आला आहे. शनिचौकातील हि रहाड १२×१२ (लांबी×रुंदी) अशी आहे . या रहाडीचा रंग हा गुलाबी ठरलेला आहे. त्याचपध्दत्तीने इतर राहाडींचेही रंग ठरलेले आहेत . त्यामुळे कुठला इसम कुठल्या रहाडितुन नुकताच डुंबून आला हे लगेच कळते...रंगपंचमीच्या आदल्या दिवसापासून रहाडिचे उत्खनन करण्यास सुरुवात होते त्याचे संपूर्ण उत्खनन झाल्यानंतर तिची विधिवत पूजा केली जाते व नंतर रंग बनवण्यास सुरुवात होते रंग हा पूर्णपणे नैसर्गिक पध्दत्तीने बनवला जातो.
 
पाने फुले हळद कुंकू हे सर्व पदार्थ एकत्र करून ते ४ ते ५ तास एका भांड्यात गरम करून एकत्र केले जातात.
 
रहाडीच वैशिष्ट्य म्हणजे रंगपंचमी साजरी झाल्यानंतर ती पुरताना प्राचीन अशा असणाऱ्या बल्याचांच वापर केला जातो. (सागवानी लाकडाचे मोठे मोठे ओंडकेे) व रहाडीत आधीच्या रंगाचे पाणी अर्ध रहाड भरलेली अशा पद्धतीने ठेवून त्यावर उसाचे चिपाड व त्यावर माती या पद्धतीने पुरली जाते.
 
अश्या प्राचीन लाकडी ओंडके अर्थात बल्याचा उपयोग फक्त याच रहाडीत होतो.
 
रंग बनवून संपूर्ण रहाड सजवल्यानंतर रंगाची पूजा होऊन , तो पहिला रंग सर्वप्रथम शनिचौकतील शनी देवावर व रास्ते तालमीच्या मारुती वर टाकला जातो व त्यांनतर दीक्षित घराण्यातील जेष्ठ व्यक्ती पहिली उडी पूर्व दिशेकडून टाकतात.या रहाडीत आपण काही तास डुंबलो तर दोन ते तीन दिवस आपल्या शरीरावरील रंग जात नाही.
दिल्लीदरवाजा रहाड :-
पेशवे कालीन या राहाडीची देखभाल आणि मान समस्त तुरेवाले पंच मंडळ यांच्या कडे आहे. बेळे गुरुजी च्या घराण्याकडून विधिवत पूजा करून झाल्यावर ही राहाड सर्वासाठी खुली केली जाते.रहाडीचा आकार हा तुलनेने लहान असून त्या रहाडी पासून रंगपंचमीच्या दिवशी मिरवणूक निघते. या रहाडीचा रंग हा केशरी (लाल) ठरलेला असून त्यासाठी पळसाच्या फुलांचा उपयोग करतात.
 
तिवंधा मधली रहाड :-
पेशवेकालीन रहाड ची धुरा आधी मधल्या होळी मध्ये राहणाऱ्या दिक्षित घराण्याकडे होती पण काही वर्षापासून हा मान तिवंधा मधील बाळासाहेब जलगावकर यांच्या कडे आहे.तसेच ह्या रहाडीची देखभाल आणि सांभाळ कलाविश्व मंडळ आणि हिंदमाता मंडळ यांच्या कडे अनेक वर्षा पासून आहे.
 
बुधा हलवाई च्या समोर तिवंधा चौकात ही रहाड असते ,तशी ही रहाड १२×१० ची आहे आणि उंची १२ फूट खोल आहे.
रहाड चा रंग पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवला जातो.
ह्या रहाडीचा रंग पिवळा असतो.
रहाडीची सगळी धुरा येथील स्थानिक मंडळाकडे आहे.
 
तांबट लेन मधली रहाड :-
ही रहाड उंची ला १५ फूट खोल असून १०× १३ आकार आहे.येथील रंग हा केशरी किंवा लालसर असतो .
 
येथील रहाडची जुनी तांबट लेन परिसर मंडळाकडे आहे.बाकीच्या रहाड ह्या आता काही कारणास्तव उघडण्यात येत नाही.
 
राहाड मध्ये आंघोळ करणे याला धप्पा असे ही संबोधतात.एकदा धप्पा मारला की बाजूच्या २० ते २५ माणसावर पाणी उडाले च समजा. उत्तम सूर मारणारा म्हणजे धप्पा मारणारा व्यक्ती राहाड मध्ये मनसोक्तपणे आनंद घेऊ शकतो.
 
ह्या रहाडीमध्ये धप्पा मारण्यासाठी नाशिक मधून च नव्हे तर विदेशातून पर्यटक येतात...........
 
सध्या नाशिक मध्ये तिन रहाड सुरु आहे. त्या तिन्ही रहाडीमध्ये रंग वेगवेगळे ठरलेले आहे. लाल,केशरी आणि पिवळा.नाशिकच्या रंगपंचमीला जवळपास ३०० वर्षाचा पेशवेकालीन इतिहास असून याचे दाखले देण्यासाठी आजही नाशिक मध्ये तीन ठिकाणी या खास रंगपंचमी साठी तयार केलेल्या रहाडी आपला इतिहास जतन करून दिमाखात उभ्या आहे. पंचवटी येथे शनि चौकात अशीच एक रहाड पेशवेकालीन आहे जिचा मालकी हक्क त्याकाळचे सरदार रास्ते यांच्या पूर्वजांकडून चालत आला आहे. येथील उत्सव हा शनि चौक मित्र मंडळ आणि सरदार रास्ते आखाडा तालीम रहाड उत्सव समिती यांच्या मार्फत साजरा केला जातो. या ठिकाणी असलेली या राहाडीची उंची साडे पाच फुट व आकार हा दहा बाय दहा असा आहे. रंगपंचमीच्या दिवशी या राहाडीची दुपारी दोन वाजता पूजा अर्चा, नेवैद्य व आरती केली जाते त्याचा मान हा अविनाश दीक्षित यांच्या घराण्याकडे आहे. तसेच या राहाडीत पहिली उडी देखील याच दीक्षित घराण्याला आहे.
 
या राहाडीचे महत्व असे सांगितले जाते कि वसंत ऋतूच्या सुरवातीला येणारा सन हा रंगपंचमी असून या ऋतूत येणारे आजार जसे गोवर, कांजण्या व देवी या सारखे रोग लागू नये व हा वसंत ऋतू आनंदात जाण्यासाठी व लहान मुलांना उन्हाळा बाधत नाही म्हणून या ठिकाणी येवून राहाडीतील रंगाने अंघोळ केल्यास या रोगांपासून आपली सुटका होते अशी आख्यायिका असल्याने या ठिकाणी नाशिक मधील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील ज्यांना याची माहिती आहे असे हजारोंच्या संखेने नागरिक येत असतात. या ठिकाणी रंगाने अंघोळ करण्यासाठी अडीच वर्षांच्या बाळा पासून ते सत्तर वर्षांच्या वयापर्यंतचे लोक येवून रंग खेळतात.
 
नाशिक मध्ये पेशवेकालीन १६ रहाडी होत्या मात्र आजच्या घडीला फक्त शनिचौक पंचवटी,दिल्ली दरवाजा व तीवंधा चौक या तीनच उरल्या आहे .पूर्वी काळाराम मंदिर पूर्व दरवाजा,सरदार चौक,रोकडोबा तालीम,तीवंधा चौक,जुनी तांबट अळी ,कादर चौक फुले मार्केट,सुंदर नारायण मंदिर, वावरे गल्ली, मखमलाबाद, घनकर गल्ली अशा ठिकाणी रहाडी होत्या प्रत्येक राहाडीचा पूजेचा मान वेगवेगळ्या घराण्यांकडे होता मात्र रस्ते तयार झाले, काही ठिकाणी झालेल्या दुर्घटना आणि वाढत्या लोक संखेबरोबर त्या लोप होत गेल्या आहे .
 
रहाड..रंगपंचमी नाशिकची खासियत..रंगपंचमी खेळण्याची नाशिकरांची पध्दत काही औरच आहे..साधारणपणे 25 बाय 25 फुटाचे ..8 फुट खोलीचे दगडी हौद (पेशवे कालीन) नाशकात खोदलेले आहेत.शनीचौक पंचवटी..गुलाबी रंगाची..मानकरी सरदार रास्ते आखाडा तालिम संघ..गाडगे महाराज पुलाजवळ..पिवळारंग.रोकडोबा तालिम संघ..तिवंधा केशरी मधळी होळी तालमी जवळ ..केशरी नारंगी रंगाच्या वैशिष्ट्यपूर्णा सह.. विधी पुजन करुन.. रंग उकळून टाकला जात असे,…रंग इतका पक्का असतो कि ऐकदा यात उडी मारली कि किमान दोन दिवस तरी रंग निघत नाही..हजारो मंडळी यात उड्या मारुन अंधोळ करतांत..उडी मारण्याच्या एक पध्दतीला” धप्पा.”.मारला असे मजेदार नाव आहे.धप्पा मारल्यावर किमान 20 ते 25 माणसाच्या अंगावर रंगाचे पाणी उडालेच म्हणून समजा .उत्तम उडी मारणाराच घप्यात तरबेज होतो..कारे राहाडीत धप्पा मारला नाही वाटतो.. या वर्षी ..आंगावर रंग नाही या वरुन रंग पंचमी खेळळी की नाही हे नाशिकर ओळखत असे..
 
रहाड म्हणजे पुर्वी गल्लीतील तालमी तीलमी च्या पहेलवान मंडळी च्या गटा तटांची.. शक्ती प्रदर्शनाची जागाच जणू..रंगपंचमीच्या निमित्ताने.. राहाडी वर ये मग पाहून घेतो तुझ्या कडे असा पूर्व संबधाच्या वादाचा इशारा पण असे..मग काय राहाडी वर.किरकोळ हाण्यामार-या…राहाडा..हा शब्दप्रयोग दोन समुहातील भांडण या अर्थाने मराठी भाषेत रुढ झाला .. रंगपंचमी च्या दिवशी.पक्का नाशिकर राहाडी वर जाउन..रंगात उडी मारुणच येणार.. आबाल ,वृद्ध ,तरुण ,तरुणी, मोठया आनंदाने यात सहभागी होतात..जोडीला नाशिक चा ढोल पथक.बेफान नृत्य याची सर.यायची नाही.या करता यावे लागेल राहाडी वर…चला रंग खेळूया..
 
पाऊस कमी पडल्यास व पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यास यापैकी काही रहाडी बंद ठेवण्याचे भानही बाळगले जाते. याआधीही महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यानंतर रहाड उघडण्याची परंपरा खंडित केली होती. लोकही वस्तूस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यास सहकार्य करतात.
pics: social media