बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (16:21 IST)

सांगा कसं जगायचं, ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार नाही

राज्यातील ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. जुलै महिन्याचा पगार झाला नसतांना सात तारखेला होणारा ऑगस्ट महिन्याचा पगारही झालेला नाही. त्यामुळे दोन महिने एसटी कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
 
आधीच अनेकांना तुटपुंजा पगार असतांना आता दोन महिन्यांचा पगार न झाल्याने आता अनेकांनी मिळेल ते काम करायला सुरुवात केली आहे. त्यातच राज्यात एसटी सेवा सुरू झाल्याने पगार झाला नसतांना अनेकांना कामावरही हजर राहावे लागत आहे, याबाबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना अध्यक्ष संदीप शिंदे आणि महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
 
पगार झाला नसतानाही अनेकांना कामावर हजर राहावे लागत आहे.  राज्य सरकारने अनुदान द्यावे आणि महामंडळाची आर्थिक कोंडी सोडवावी अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.