गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (16:34 IST)

एसटी कर्मचाऱ्यांना दररोज २२५ रुपये भोजन भत्ता मिळणार

बेस्टच्या सेवेत असलेल्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोज २२५ रुपये भोजन भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली आहे. 
 
कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ व संबंधित कंपनीकडून जेवण पुरविण्याची वेळ यामध्ये तफावत असल्याने जेवणाबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांकडे केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन सदर खाजगी कंपनीचे जेवणाचे कंत्राट तातडीने रद्द करुन सर्व कर्मचाऱ्यांना दररोज रोखीने भोजन भत्ता देण्यात यावा, असे निर्देश मंत्री परब यांनी दिले होते.