सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (16:32 IST)

ते वृत्त खोटं, मेधा कुलकर्णी यांनी शेअर केला विडीओ

भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्वत: एक व्हि़डीओ शेअर केला असून आपण भाजपामध्येच असल्याचं स्पष्ट केलं आहे. मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकला हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी मला पक्षाने जे विधानपरिषदेचं आश्वासन दिलं आहे ते नक्की पाळलं जाईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
 
‘गेले दोन दिवस माझ्या संदर्भातील ज्या खोट्या बातम्या मुद्दामून प्रसारित केल्या जात आहेत त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी आवर्जून मी आपल्यासमोर उपस्थित आहे. मी कुठेही जात नाहीये, भाजपातच आहे. यापूर्वीही मी कधीही कोणत्याही राजकीय नेत्यांच्या संपर्कात नव्हती, आजही नाही. मागच्या वर्षी जेव्हा मला विविध पक्षांकडून ऑफर्स आल्या होत्या, त्यावेळीही नम्रपणे नकार दिला होता. पक्षांतर्गत काही प्रश्न जरुर आहेत. पण या प्रश्नांची उत्तरं पक्षीय पातळीवर सोडवली जातील अशी आशा आहे त्यामुळे त्याबद्दल जाहीर वाच्यता करण्याची गरज वाटत नाही,” असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
 
पुढे त्या म्हणाल्या आहेत की, “चंद्रकांत पाटील यांनी मला विधानपरिषदेचं आश्वासन देताना पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाविषयी स्पष्ट कल्पना दिली होती. त्यांनी काही व्यक्तींना आश्वासन आणि शब्द दिला आहे. एखाद्याला शब्द दिल्यानंतर त्याची मानसिकता काय असते यासंदर्भात त्यांनी किती परिश्रम केलेले असतात याची मला कल्पना आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशीच इच्छा असल्याने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचा प्रश्न उद्धभवत नाही. मला पक्षाने जे विधानपरिषदेचं आश्वासन दिलं आहे ते नक्की पाळलं जाईल असा विश्वास आहे”.