मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (16:45 IST)

बाप्परे, अवघ्या 13 दिवसाच्या बालकाचा निर्दयीपणे खून

The brutal murder
सांगलीतल्या भिलवडीतील पाटील मळा इथं अवघ्या 13 दिवसाच्या बालकाचा निर्दयीपणे खून करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याच्या टाकीत 13 दिवसाच्या चिमुरड्याचा मृतदेह आढळला. स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. 
 
पोलिसांनी घटनास्थळी शोध सुरू केला असता सिंटेक्स पाण्याच्या टाकीत टाकूनच 13 दिवसाच्या बाळाची हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप खुनाचं कारण समजू शकलेलं नाही.
 
बाळाविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी अधिक माहिती गोळा करण्यात काम पोलीस सध्या करत आहे. पोलिसांच्या पथकाने टाकीतून बाळाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.