सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (10:07 IST)

एसटी पूर्ण क्षमतेने आजपासून चालणार, प्रवाशांना मिळणार दिलासा

एसटी महामंडळाने पूर्ण क्षमतेनं एसटी चालवण्याची परवानगी दिली असली, तरी प्रवास करताना प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझरचे नियम पाळणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याशिवाय, प्रवासी वाहतुकीसाठी काढण्यात आलेली बस निर्जंतुकीकरण करूनच प्रवाशांना बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, याआधी ५० टक्के क्षमतेच्या नियमात फक्त एकच आसन आरक्षणासाठी उपलब्ध असायचे. आता मात्र पूर्वीप्रमाणेच सर्व आसने आरक्षणासाठी उपलब्ध असणार आहेत.
 
याआधी कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात दिसू लागल्यापासून एसटी महामंडळाने सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद केली होती.  मात्र, अनलॉक सुरू करण्यात आल्यामुळे टप्प्याटप्प्याने ही वाहतूक सुरू करण्यात आली. याआधी उठवण्यात आलेल्या निर्बंधांनंतर निम्म्या अर्थात ५० टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यामुळे एका सीटवर एकच प्रवाशाला बसण्यास परवानगी होती. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र, आता एसटी महामंडळानं घेतलेल्या नव्या निर्णयानुसार पूर्ण क्षमतेनं एसटी चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे.