मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 (08:23 IST)

ट्रेकिंग साठी प्रसिद्ध हरिश्चंद्रगड येथे अडले २० गिर्यारोहक, बचाव रात्री थांबवून सकाळी पुन्हा सुरु

ट्रेकिंग साठी प्रसिद्ध हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंग करण्यासाठी आलेले २० गिर्यारोहक अडकले असून, कल्याणजवळील हे गिर्यारोहक कोकणकडा येथे सुमारे एक हजार फुटांवर अडकले असल्याचे वृत्त आहे. असे समजताच बचाव सुरु झाला मात्र अंधार पडल्याने या गिर्यारोहकांच्या सुटकेसाठी सुरू करण्यात आलेले बचाव कार्य एनडीआरएफला थांबवावे लागले असून सकळी सुरु झाले आहेत. कल्याणचे डॉ हितेश अडवाणी हे 20 जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंग साठी आले आहेत. सर्व टीम  पुढे दीड किलोमीटर अंतरावर कोकणकडा येथे 1000 फूट खाली दरीत हे सगळे ट्रेकर अडकले असे समोर आले. ट्रेकर्सना एनडीआरएफच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यूऑपरेशन सुरू आहे; मात्र रविवारी उशीर झाला आणि अंधार असल्याने डथळा निर्माण झाला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला या घटनेसंदर्भात समन्वय ठेऊन ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणयास सांगितले आहे. बचाव पथकाचा अडवाणी यांचेशी संपर्क झाला असून त्यांच्यासोबत 5 महिला व 17 पुरुष असल्याचे समजते. कोकणकडा पासून हे सगळे अंदाजे 800 फूट खाली आहेत. त्यांना सकाळी रेस्क्यू अर्थात बाचाव सुरु होणार असून, कोणतीही जीवितहानी अजूनतरी नाही.