1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (09:35 IST)

हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे आणून राज्यातील जनतेची दिशाभूल केली जाते - शरद पवार

sharad panwar
जेव्हा निवडणुका येतात तेव्हा  हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे आणून राज्यातील जनतेची साफ दिशाभूल करण्यात येते,  असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केला आहे. राम मंदिराचा आरोप पुन्हा पुन्हा काढल्याने लोकांचा विश्वास बसणार नाही असेही शरद पवार यांनी म्हटले. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे,  मराठा आरक्षणाचा फायदा निवडणुकीत होईल असे दिवास्वप्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघत असतील तर मात्र त्यांच्या भूलथापांना जनता फसणार नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार यांनी पुन्हा भाजपवर जोरदार टीका केली आहे.