शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (23:57 IST)

पंढरपुरात १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन

पंढरपूर तालुक्यातील २१ गावांमध्ये
१४ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. संबंधित गावात १० पेक्षा जास्त रुग्ण आढळले.
 
पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील २१ गावांत १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.शिवाय ज्या गावांत १० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत अश्या गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसे आदेश प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी काढले आहेत.या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत.
 
पंढरपूर तालुक्यातील करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून विशेष मोहिमेअंतर्गत करोनाबाधित रुग्णांचा शोध घेतला जातो आहे. गावातील दुकानदार, फळे-भाजीविक्रेते, दूध विक्रेते यांची आठवड्यातून एकदा टेस्ट केली जाणार आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना कोरोना टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. त्यात कष्टकरी मजुरांचा सहभाग वाढवा म्हणून 'नो टेस्ट तर नो रेशन' संकल्पना राबविण्यात येत आहे.