1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 7 एप्रिल 2022 (21:16 IST)

बालभारती कार्यालयात स्ट्रिंग ऑपरेशन, मद्य सेवन करताना आढळला अधिकारी

नाशिकमधील महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक भांडार येथील कार्यालयात अधिकारी दारू पिताना आढळून आला आहे. भांडार व्यवस्थापक लक्ष्मण यशवंत डामसे यांना मद्य सेवन करतांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
 
नाशिक मुंबई महामार्गावर पाथर्डी फाट्यानजीक बालभारतीचे दालन आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र असून याठिकाणी वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या लक्ष्मण दामसे नामक अधिकारी दारू पितांना आढळून आला आहे. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये हि धक्कादायक बाब उघडकीस आली.
 
स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसापासून ते कार्यालयात दारू पीत असल्याची माहिती संबंधित सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली  होती. त्यानुसारत्या ठिकाणी पाहणी केली असता सदरचा प्रकार आढळून आला. सदर अधिकारी कार्यालयात मद्य पितांना बसलेला दिसून आला. यावेळी त्यास धड बोलता, चालताही येत नव्हते. पोलिसांनी तात्काळ त्यास ताब्यात घेत मेडिकल तपासणीसाठी रवाना केले.