शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (15:43 IST)

पत्नीशी भांडण झाल्यामुळे जवानाने 3 वर्षांच्या मुलीला भिंतीवर आपटले

rape
पनवेल- घरगुती वादातून झालेल्या मारहाणीत एका 3 वर्षीय मुलीचा नाहक बळी गेल्याची संतापजनक घटना घडली आहे. रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानाने पत्नीशी भांडण व मारहाण झाल्याने 3 वर्षांच्या चिमुरडीला भिंतीवर आपटले आणि यात तिचा मृत्यू झाला. आरोपीचे नाव परशुराम तिपन्ना असे आहे.
 
मुलीला केलेल्या मारहाणीत तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जवानाने 3 वर्षांच्या चिमुरडीला भिंतीवर आपटले होते, यात तिचा मृत्यू झाला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळोजा येथील तलावाजवळ असणाऱ्या डेम्ब्रिजमध्ये एका तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्यावर खारघर पोलिसांनी मुलीच्या फोटोवरुन तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा सदर मुलगी पापडी पाडा गावातील रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानाची असल्याचे समजले. 
 
पोलीस जवानाच्या घरी गेल्यावर जवानाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. घरगुती भांडणात मुलीला भीतीवर आपटल्याने तिच्या डोक्यावर जबर मार लागून तिचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे पहाटेच्या सुमारास मुलीचा मृतदेह तळोजा तलावाशेजारी असणाऱ्या डेब्रिजच्या भरावामध्ये पुरण्याचा प्रयत्न केल्याची आरोपीने कबुली दिली. आरोपी परशुराम तिपन्नाला अटक करुन त्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.