शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (12:28 IST)

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा आहे? आजच येथे असा करा अर्ज

student
शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता जिल्हा सैनिकी मुला मुलींचे वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिकांच्या विरपत्नी व सेवारत सैनिक यांनी वसतिगृह प्रवेशासाठी आपल्या पाल्यांचे प्रवेश अर्ज 30 जून 2022 पर्यंत सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
 
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, सैनिकी मुला मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इच्छुक पालकांनी वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी संबंधित वसतिगृहातुन प्रवेश अर्ज व माहिती पत्र घेवून आवश्यक त्या कागदपत्रांसह वसतिगृह अधिक्षक व अधिक्षिका यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करतांना डिस्चार्ज बुक, माजी सैनिक/ सैनिक विरपत्नी असल्याबाबतचे ओळखपत्र, ECHS कार्ड इत्यादी कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहेत.
 
प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर वसतिगृह व्यवस्थापन समितीमार्फत अर्जांची छाननी करून निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व पालकांनी व प्रवेश घेणाऱ्या पाल्यांनी सोमवार 4 जुलै 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह, शासकीय दुध डेअरी जवळ, पत्रकार कॉलनी, त्र्यंबक रोड,नाशिक येथे उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे.