देसाई म्हणाले की, राजीनामा देण्याबाबत पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल. सरकारच्या कामगिरीबद्दल ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला तीन वर्षे झाली आहेत. यामध्ये प्रयत्न नक्की झाले आहेत; परंतु सगळे समाधानी आहेत, असे म्हणता येत नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकर्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेची मागणी होती, ती अद्याप पूर्ण झालेली नाही. काही गोष्टींत त्यांनी प्रयत्न केले असून, त्यामध्ये त्यांना यश यावे, या शुभेच्छा आहेत असे सांगितले आहे.