सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (17:56 IST)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

raj thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना पाय आणि कंबर दुखण्याचा त्रास सुरू होता. त्यासाठी त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. 1 जून रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती, मात्र त्यांच्या शरीरात कोविड डेडसेल आढळल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलली होती.अखेर लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली आहे. पाय आणि कंबरेच्या दुखण्याच्या त्रासामुळे राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया केली. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.