संबंधित माहिती
- केंद्राकडून मराठा आरक्षण प्रकरणी फेरविचार याचिका दाखल
- राज्यात 24 तासांत 40 हजार नवीन प्रकरणे, 793 मृत्यूमुखी
- अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI नंतर ईडीकडून गुन्हा दाखल
- दिलासादायक बातमी :राज्यात कोरोनाच्या प्रकरणात मोठी घसरण मुंबईवरून देखील चांगली बातमी आली
- खळबळजनक, पत्नीचा गळा दाबून तर चिमुकलीचा गळा कापून खून, स्वतः केली आत्महत्या
विवाहीतेची आत्महत्या, सासरच्या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल
चारित्र्याच्या संशयासह पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी माहेरून ५० हजार रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहीतेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल कु-हाडे, नाना कु-हाडे, सवडूबाई कु-हाडे,अनिल कु-हाडे,चंद्रकला गायकवाड ,शाकिला शिंदे (रा.जनार्दनस्वामी नगर,नांदूरनाका) अशी संशयीतांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहिणी कु-हाडे या २४ वर्षीय विवाहीतेने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारीत लग्नानंतर सासरच्या मंडळीने किरकोळ कारणातून मानसिक व शाारिरीक छळ केल्याचे म्हटले आहे. तसेच चारित्र्याच्या संशयासह पोल्ट्री फॉर्म टाकण्यासाठी माहेरून ५० हजार रूपये आणावेत या मागणीवरून मारहाणीत तिचा दोन वेळा गर्भपात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
