मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (12:00 IST)

10 वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या

suicide
नांदेड जिल्ह्यात चौथी वर्गात शिकणार्‍या 10 वर्षाच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. आदिवासी आश्रम शाळेतील मुलींच्या वसतिगृहात हा प्रकार घडला आहे. 
 
विश्रांती देशमुख ही हदगाव तालुक्यातील केदारगुढा येथील आदिवासी आश्रम शाळेत शिकत आहे. काल संध्याकाळी 5 च्या सुमारास तिने वसतिगृहातील आपल्या दुमजली बेडच्यावायरच्या लोखंडी रॉडला ओढणी बांधून आत्महत्या केली. तिने एवढा मोठा पाऊल का उचलला हे अद्याप समजू शकले नाही आहे. 
 
 मृत तरुणीच्या दोन बहिणी याच आश्रम शाळेत शिकत आहे. शाळेतून आश्रमाच्या खोलीत आले असताना खोलीचा दरवाजा बंद होता.  आवाज देऊन ही तरुणी दरवाजा उघडत नसल्याने व्यवस्थापनाने दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. दरवाजा तोडला असता तरुणीने पलंगाला दोरी लावून गळफास घेतल्याचेही निदर्शनास आले. या घटनेचे पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
 
Edited by : Smita Joshi