संबंधित माहिती
- सुप्रिया शिंदेला पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेत यश २३ व्या वर्षी होणार प्रशासकीय अधिकारी
- बेळगाव सरकारी कार्यालये बंदमुळे नागरिकांचे हेलपाटे
- शरद पवारांचा एकेरी उल्लेख भाजप आमदार राम सातपूते यांच्याकडून माफी
- दुसऱ्याच्या घरात मुलगा झाला म्हणून किती दिवस पेढे वाटणार? -देवेंद्र फडणवीस
- कसबा, चिंचवडचा निकाल भाजपला एकनाथ शिंदेंबरोबरच्या युतीबाबत पुनर्विचार करायला लावेल का
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीची आत्महत्त्या, गळफास घेत संपवले जीवन
नाशिक: नाशिक मधील आडगाव परिसरातुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आडगाव परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय उच्चशिक्षण घेत असलेल्या तरुणीने गळफास घेत आत्महत्त्या केली आहे.
कल्याणी राजाराम फाफाळे असं मयत तरुणीचे नाव आहे. ती मूळची निफाड तालुक्यातील मऱ्हाळभोई गावाची असल्याची माहिती समोर आलीये.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी ही नाशिकमध्ये शिक्षण घेत होती. शिक्षणानिमित्ताने ती मैत्रिणींसमवेत म्हाडा कॉलनीच्या इमारतीमध्ये भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होती. आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास तिची मैत्रिण गेल्यानंतर तिने राहत्या खोलीत गळफास लावून घेत आत्महत्त्या केल्याचे समजले.
घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.दरम्यान, कल्याणी हिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्यातील डाटा उडविण्यात आलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले.आत्महत्त्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor
Edited by : Ratnadeep Ranshoor
