शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (12:29 IST)

नैराश्यातून आईने केली मुलासोबत आत्महत्या

चंद्रपूरमध्ये बी. कॉम. अभ्यासक्रमाचा पेपर बिघडल्यामुळे नैराश्यातून आईने स्वत:च्या पोटच्या गोळ्याला पदराने पोटाला बांधून रामाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. रुपाली आशिष गुज्जेवार (२८) व अभीर आशिष गुज्जेवार (५) रा. पी.एच.नगर. जुना पॉवर हाऊसजवळ चंद्रपूर असे मृत मायलेकाचे नाव आहे. रुपालीचा सोमवारी बी.कॉमचा पेपर होता. तिच्या सासऱ्याने तिला पडोली येथील समाजकार्य महाविद्यालयात असलेल्या केंद्रावर पोहचवून दिले. पेपर सुटल्यानंतर रुपाली घरी आली. मात्र पेपर बिघडल्यामुळे ती अस्वस्थ होती. तिचा मुलगा अभीर शिकवणी वर्गात गेला असल्याने रुपाली बॅग घेऊन शिकवणी वर्गात गेली. त्यानंतर आपली बॅग व अभीरची ट्युशन बॅग तिथेच ठेवून ‘काही वेळात येते’ असे सांगत ती बाहेर गेली. त्यानंतर रुपाली थेट बगड खिडकी परिसरातील रेल्वे लाईनवर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गेली. रेल्वे फाटक बंद असल्याने ती फाटकाखालून रुळावर गेली. मात्र तिथे उपस्थित एका व्यक्तीने तिला थांबविले. त्यानंतर ती रुळावरून परत आली. त्यानंतर बुधवारी रामाळा तलावात गेलेल्या मच्छिमारांना रुपाली व अभीरचा मृतदेहच आढळून आला.