गुरूवार, 8 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 सप्टेंबर 2019 (16:33 IST)

सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण, बेड रेस्टचा सल्ला

Supriya Sule
विधानसभा निवडणुकांना अवघा एक महिना राहिला असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या बेड रेस्ट असल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूक पेजवर याबाबत माहिती दिली आहे. यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ताई काळजी घ्या अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
 
विधानसभा निवडणुकीची घोषणा करता सर्वच पक्षांकडून प्रचाराकरता जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, ऐन प्रचाराच्या वेळीच सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे प्रचारात सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी सज्ज असताना डेंग्यूची लागण झाल्याबद्दल त्यांनी खंत देखील व्यक्त केली.