1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (10:09 IST)

चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागू नये भाजप प्रवेश सुरु :सुप्रिया सुळे

supriya sule
सध्या महाराष्ट्राचे राजकारण सध्या तोडपाणीचे झाले असून कोणाला आपला कारखाना वाचवायचा आहे तर कोणाला सत्तेसोबत संबंध ठेवायचे आहेत, कोणाला घोटाळ्यातून बाहेर पडायचे आहे. याशिवाय अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) यांच्या चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणूनही अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. संवाद दौरा कार्यक्रमानिमित्ताने त्या  परभणी बोलत होत्या.  
 
खासदार सुळे म्हणाल्या, की आपल्याला बेरोजगारांपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांची मोठी चिंता आहे. बेरोजगारांना नरेगाच्या किंवा इतर कामाच्या माध्यमातून रोजगार मिळू शकतो. परंतु देशात सर्वत्र मंदी असल्याने सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न मोठा आहे. निती आयोगाकडून देशातील आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु भाजपा सरकारने याची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे देशात मंदीची लाट आली आहे असे त्यांनी सांगितले.