काँग्रेसच्या 'गुंगी गुडिया' वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली; म्हणाल्या....
सुनेत्रा पवार यांना 'गुंगी गुडिया' म्हटल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली.
महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात केलेल्या 'गुंगी गुडिया' वक्तव्यामुळे राज्यभरात राजकीय गदारोळ माजला आहे. आता खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.
काँग्रेस पक्षाची वक्तव्ये 'पूर्णपणे अनुचित' असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला की, त्यांनी या प्रकरणी दिल्लीतील काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी थेट संवाद साधला होता. सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कोणत्याही महिला नेत्याविरुद्ध अशी आक्षेपार्ह भाषा वापरणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी स्पष्ट केले, "सुनेत्रा वाहिनीबाबत महाराष्ट्र काँग्रेसने केलेले वक्तव्य अनुचित होते. मी या विषयावर तात्काळ काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी संपर्क साधला. माझ्या फोननंतर अर्ध्या तासाच्या आत हायकमांडने आपली भूमिका स्पष्ट केली. हे वक्तव्य महाराष्ट्राच्या स्थानिक आयटी सेलचे बेजबाबदार कृत्य होते; हे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत मत नाही. केंद्रीय नेतृत्वाने उदारता दाखवत तात्काळ परिस्थिती हाताळली."
Edited By- Dhanashri Naik
