सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 13 जून 2022 (22:00 IST)

उद्या सुशांतचा मृत्यूदिन,निलेश राणे यांचा सुशांत सिंह राजपूतवरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा

nilesh rane
पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त शिवसेनेतर्फे  राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, याच वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
 
निलेश राणे म्हणाले, आज १३ जून पेंग्विनचा वाढदिवस. १४ जून २०२० सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू. १३ जून २०२० रात्री १ पार्टी झाली ज्या पार्टीमध्ये बरच काही घडलं/बिघडलं, ७० दिवसांच्या सारवासारव नंतर सीबीआयला एंट्री मिळाली तोपर्यंत सगळे पुरावे नष्ट करण्यात आले होते. एक ना एक दिवस सत्य बाहेर येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
 
दरम्यान, 14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तर त्याआधी सुशांतची मॅनेजर दिशा सालियन हिनेही आत्महत्या केली होती. या दोन्हींवरून ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता. यावरुन राज्यात भाजप-शिवसेना संघर्ष चांगलाच पेटला असल्याचे दिसून आले होते.