शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (21:17 IST)

सुषमा अंधारे म्हणतात, ‘Tiger Is Back’

sushma andhare
शिवसेना (ठाकरे गट) नेते खा. संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीतून सुटका झाली. यावर शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘Tiger Is Back’ असे ट्विट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे.
 
शिवसेना कुटुंबातील एक लढवय्या सदस्य ज्यांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न केले गेले पण ते लढले आणि त्यांना जामीन मिळतोय. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे असे मत अंधारे यांनी यावेळी व्यक्त केले. ‘मी मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही’ असे ठामपणे सांगणारा आमचा नेता परत आला आहे असे सांगताना त्या भाऊक झाल्या. 
यावेळी अंधारे म्हणाल्या, बाळसाहेबांचा लढाऊ सरदार हा कधीही हात टेकत नाही, तो फक्त लढतो. बाळासाहेब ठाकरे यांचा लढाऊ सरदार कसा असावा याचा आदर्श संजय राऊत यांनी घालून दिला असल्याचे अंधारे यावेळी म्हणाल्या. जे सुखात सोबत असतात ते इतके खरे नसतात पण जे दुःखात साथ देतात ते खरे असतात असा टोलाही त्यांनी यावेळी शिवसेनेतून बाहेर गेलेल्या 40 आमदारांना लगावला.
 
Edited by- Ratnadeep Ranshoor