1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑक्टोबर 2018 (09:12 IST)

धक्कादायक प्रकार उघड : डेंग्यू, स्वाईन फ्लूचे खोटे रिपोर्ट, हॉस्पिटलकडून रुग्णाची लुट

वातावरण बदलामुळे नाशिकमध्ये साथीचे रोग पसरले आहेत. सोबतच स्वाईन फ्लू आणि डेंग्यूने शहरात भीती निर्माण केली असून, अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिक भितीपाई काही लक्षणे दिसली की रुग्णालयात धाव घेत आहे. याच भीतीचा फायदा घेत शहरातील दोन मोठ्या रुग्णालयांनी चक्क डेंग्यू चे चुकीचे आणि खोटे निदान करून रुग्णांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक केली आहे. मनपाला प्राप्त झालेल्या तक्रारी नंतर दोघांवर कारवाई सुरु केली असून, इतर हॉस्पिटल देखील तपासले जाणार आहेत
 
शहरातील संजीवनी आणि सुयोग हॉस्पिटल येथे दाखल असेलल्या रुग्णाच्या घरातील सदस्यांनी सेकंड ओपेनियान म्हणून पुन्हा रक्ताची व इतर तपासण्या केल्या, मात्र त्यात रुग्णाला काहीच झाले नाही असे समोर आले, तेव्हा सर्वाना धक्काच बसला. खोटे रिपोर्ट दाखवून फसवणूक झाली हे समोर आले आहे.यामध्ये आजीज सय्यद, देवानंद बैरागी यांनी सर्व माहिती आणि पुराव्यासह मनपा आरोग्य विभागास माहिती दिली आहे. यानुसार मनपाने कारवाई सुरु केली असून सोबतच इतर देखील रुग्णालयांची तपासणी सुरु करणार आहेत.
 
“आम्ही रुग्ण खरच आजारी आहे का म्हणून त्याची पुन्हा एकदा तपासणी केली आणि आम्हाला धक्काच बसाल की डेंग्यू झालाच नाही, शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे”– अजीज सय्यद
 
“आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, ऑडीट मध्ये रुग्णालय दोषी आढळत असतील तर त्यांचे रजिस्ट्रेशन राद्द करणे आणि डॉक्टर असतील त्यांचा परवाना रद्द करता येईल का याबबात विचारपूर्वक कारवाई करणार आहोत “ – डॉ. जयराम कोठारी ( वैद्यकीय अधीक्षक, मनपा )