गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018 (16:33 IST)

होर्डिंग कोसळून दोन जणांचा मृत्यू

पुण्यात शाहीर अमर शेख चौकात येथे एक मोठे होर्डिंग कोसळून दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत काही रिक्षा चक्काचूर झाल्याची माहिती समोर येत आहे.
 
होर्डिंग कोणत्या कंपनीचे होते, होर्डिंग लावताना नियमाचे पालन झाले होते का, याची माहिती मिळालेली नाही. सदरच्या मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याने या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.